चेकिंग अधिकारी विजय पवार याने एसटी वाहक महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी - Maratha Darbar

Breaking

Saturday, April 27, 2024

चेकिंग अधिकारी विजय पवार याने एसटी वाहक महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी

 चेकिंग अधिकारी विजय पवार याने एसटी वाहक महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी


गजानन डाबेराव

मराठा दरबार न्यूज

कार्यकारी संपादक बुलढाणा



बुलढाणा :- खामगांव राज्य परिवहन मंडळाच्या लाईन चेकिंग अधिकाऱ्याने सविस्तर असे की एसटीच्या एका वाहक महिलेकडे  शरीर सुखाची मागणी केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून सदर अधिकाऱ्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करून नोंदविण्यात आला आहे. खामगाव एसटी आगारात कार्यरत असलेल्या एका 38 वर्षीय वाहक महिलेला मागील काही दिवसांपासून परिवहन महामंडळाचा लाईन चेकिंग अधिकारी विजय पवार हा त्रास देत होता तो सदर वाहक महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत होता आज त्याच्या विरुद्ध दाखल तक्रारीवरुन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.