अवधा येथे आदीशक्ती वळेखन माऊलीचा यात्रा महोत्सव - Maratha Darbar

Breaking

Monday, April 22, 2024

अवधा येथे आदीशक्ती वळेखन माऊलीचा यात्रा महोत्सव

 अवधा येथे आदिशक्ती वळेखन माऊलीचा यात्रा महोत्सव


गजानन डाबेराव 

 मराठा दरबार


न्युज

जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा




मराठा दरबार/बुलढाणा :-अवधा खुर्द तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा येथे आदिवासी टाकोनकार पारधी समाजाचे धर्मगुरू स्वर्गीय  दासफुले महाराज फुलसिंग डाबेराव विदर्भ व्यास पुरस्कार प्राप्त ३०० हून अधिक ग्रंथाचे लेखक, कवी यांच्या प्रेरणेने संपूर्ण देशातील समस्त पारधी टाकोनकार समाज बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या श्री वळेखन माऊलीचा भव्य अवधादेवी दर्शन यात्रा महोत्सव २३ एप्रिल २४ एप्रिल रोजी श्री क्षेत्र आदिशक्ती जगदंबा वळेखण देवी संस्थान अवधा खुर्द येथे आयोजित केला आहे. यामध्ये आदिवासी टाकोनकार पारधी समाज बांधवांच्या परंपरेनुसार चैत्र पौर्णिमेला मंगळवार ला २३ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता आरती, १२.३० ते २ वाघरी बोली भाषा प्रचार व प्रबोधन, ६.३० ते रात्री ९ महाप्रसाद खिचडा, सायंकाळी ७ वाजता महाआरती, रात्री ८ ते ९ सामाजिक प्रबोधन, तसेच २४ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता पासून पुढे गायन खुळ

भजन व अखंड माउली जागरण सकाळी ६.३० वाजता आरती, सकाळी ८ वाजता अल्पोपहार व समापन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त सल्लागार व यात्रा उत्सव समिती श्रीक्षेत्र आदिशक्ती जगदंबा वळेखन देवी संस्थान अवधा गड तालुका नांदुराच्च्या वतीने करण्यात आले आहे.