खामगावच्या हरियाणा जिलेबी सेंटरवर बुलढाणा FDAचा छापा
अन्न सुरक्षा आयुक्त अधिकारी प्रमोद पाटील यांच्यासह पथकाची कारवाई
खामगाव : शहरातील हरियाणा जिलेबी सेंटरवर बुलढाणा अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने छापा टाकून तपासणी केली. अन्न सुरक्षा आयुक्त अधिकारी प्रमोद पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांनी सेंटरमधील खाद्यपदार्थ, कच्चा माल तसेच स्वच्छतेची पाहणी केली.
या कारवाईदरम्यान अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले आहेत का, तसेच नियमांचे उल्लंघन आढळले का, याबाबतचा अधिकृत अहवाल अन्न व औषध प्रशासनाकडून स्पष्ट होणार आहे.