काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी ईनायत खान यांची दुसऱ्यांदा निवड - Maratha Darbar

Breaking

Friday, September 18, 2026

काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी ईनायत खान यांची दुसऱ्यांदा निवड

काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी ईनायत खान यांची दुसऱ्यांदा निवड

बुलढाणा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बुलढाणा जिल्हा संघटनेत ईनायत खान यांची जिल्हा सरचिटणीसपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. त्यांच्या संघटनात्मक कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर पुन्हा जबाबदारी सोपविली आहे.

काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये ईनायत खान यांनी यापूर्वीही सक्रिय भूमिका बजावली आहे. पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये तसेच संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची पुन्हा जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या निवडीबद्दल काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांकडून ईनायत खान यांचे अभिनंदन करण्यात येत असून, आगामी काळात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ते अधिक सक्रियपणे कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.