पळशी बुद्रुक येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न** - Maratha Darbar

Breaking

Saturday, April 11, 2026

पळशी बुद्रुक येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न**

 पळशी बुद्रुक येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न


 २८५ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजना व दाखल्यांचे प्रत्यक्ष वाटप

खामगाव (अजयसिंह राजपूत): महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या जनकलल्याणाकारी मोहिमेअंतर्गत, पळशी बुद्रुक महसूल मंडळाच्या वतीने 'छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर' अत्यंत उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणा थेट जनतेच्या दारी पोहोचली असून, एकाच छताखाली २८५ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ आणि दाखल्यांचे वाटप करण्यात आले.या शिबिरासाठी जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी श्री. शेलार साहेब (बुलढाणा) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच खामगावचे तहसीलदार श्री. सुनील पाटील यांनी शिबिराचे नियोजन व अंमलबजावणीवर मार्गदर्शन केले. याप्रसंगी पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी श्री. शेख साहेब, तालुका कृषी अधिकारी श्री. सुनील पवार आणि पुरवठा निरीक्षक **फुलझाडे मॅडम यांची विशेष उपस्थिती होती.

गावातील प्रतिष्ठित नागरिक डॉ. सदानंदजी धनोकार, श्री. सुरेशभाऊ गव्हाळ, डॉ. मापारी साहेब, श्री. काळवाघे साहेब यांनी उपस्थित राहून प्रशासनाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. महसूल विभागाच्या वतीने मंडळ अधिकारी श्री. भरगड साहेब, श्री. इतवारे साहेब, श्री. भील साहेब यांनी कामाचा आढावा घेतला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पळशी बु. येथील ग्राम महसूल अधिकारी श्री. विजय राठोड, ग्राम महसूल अधिकारी श्री. सुनील ठोंबरे, ग्राम महसूल अधिकारी पिंपळे मॅडम यांच्यासह अडगाव, आवार, अटाळी मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि विविध विभागांचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

या शिबिरात एकूण २८५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले विविध शासकीय योजनांचे मंजुरी पत्र, जातीचे, उत्पन्नाचे व रहिवासी दाखले,कृषी विभागाच्या योजनांची माहिती व लाभ. पुरवठा विभागाशी संबंधित कामांचा निपटारा.प्रशासनाच्या या 'गतिमान' पावलामुळे पळशी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.