शेतात नेऊन अल्पवयीन बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; ५० वर्षीय इसमाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल* - Maratha Darbar

Breaking

Sunday, October 26, 2025

शेतात नेऊन अल्पवयीन बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; ५० वर्षीय इसमाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल*

 *शेतात नेऊन अल्पवयीन बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; ५० वर्षीय इसमाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल*



जलंब... सोपान पाटील 

    शेगाव तालुक्यातील जलंब पोस्टे हद्दीतील एका गावात ७ वर्षीय बालिकेवर ५० वर्षीय इसमाने शेतात नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली असून, पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

     मिळालेल्या माहितीनुसार, सदर बालिका ही आपल्या मोठ्या बहिणीसोबत शौचास गेली असता, घरी परतलेल्या बहिणीने आईला सांगितले की, घराशेजारी राहणारे नातेवाईक आबा यांनी त्या बालिकेला आवाज देऊन उचलून तुरीच्या शेताकडे नेले. संशय आल्याने फिर्यादी महिलेने आपल्या पतीसह व नातेवाईकांसह तुरीच्या शेतात जाऊन पाहणी केली असता बालिका शेतातून बाहेर येताना दिसली. विचारपूस केली असता बालिकेने सांगितले की, आबा यांनी तिचे हात व तोंड बांधून शेतात नेले. मात्र आई-वडिलांचा आवाज ऐकून त्यांनी तिला सोडून दिले, असे बालिकेने आईला सांगितले. या प्रकरणाची तक्रार जलंब पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

     यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध अप क्रमांक २३३/२०२५ कलम ७४, ९६ भा.दं.सं. सहकलम ८, १२ पोस्को कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास ठाणेदार अमोल सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुनील देव करीत आहेत.