*मराठा आरक्षण
लढ्याला मिळाले यश : कुऱ्हा येथे जल्लोषात आनंद साजरा...!*
मुक्ताईनगर:- कुर्हा /मराठा योद्धा मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या आरक्षण लढ्याला यश मिळाले. या ऐतिहासिक यशामुळे संपूर्ण राज्यभरात मराठा बांधवांतर्फे आनंद व्यक्त करून जल्लोष साजरा केला जात आहे.*
*त्याच अनुषंगाने आज "कुऱ्हा" येथे "सकल मराठा समाजाच्या" वतीने अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत "छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी व महापुरुषांच्या जयघोषात परिसर दणाणून गेला.*
*या वेळी मराठा समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष नवनीत भाऊ पाटील, उपाध्यक्ष विनोद पाटील, संचालक अनंता पाटील, सजय जवरे, बाल मुकुंद पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सतीश नागरे, मंगेश पाटील, नारायण पाटील, राहुल काळे, दिलिप पाटील, संतोष पाटील, छोटू पाटील, संदीप घाईट, योगेश पाटील, दिपक वाघ सर, अजय बागल, मुकेश पाटील, सागर पाटील, सागर सुस्ते, किशोर पाटील, शंकर पाटील, विशाल घाईट, अमोल पाटील सर, बोरसे मामा, विवेक पाटील, विनायक पाटील, सुभाष पाटील, अमोल पाटील, संजय बागल, छोटू पाटील (वडोदा), सचिन पाटील, राहुल पाटील, गजानन घाटे , अजय भोजने आदींसह असंख्य सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
