*नांदूरा घरकुल लाभार्थींना मोफत वाळू मिळावी यासाठी नांदूरा तहशिलदार यांना निवेदन* - Maratha Darbar

Breaking

Tuesday, September 2, 2025

*नांदूरा घरकुल लाभार्थींना मोफत वाळू मिळावी यासाठी नांदूरा तहशिलदार यांना निवेदन*

 (अरुण सुरवाडे नांदुरा )                                                                        *नांदूरा घरकुल लाभार्थीं


ना मोफत वाळू मिळावी यासाठी नांदूरा तहशिलदार यांना निवेदन*                                              माननीय.तहसीलदार साहेब तहसील कार्यालय नांदुरा यांच्या सेवेसी 

 अर्जदार. मुकेश अशोकराव वाकोडे रा. नांदुरा खुर्द तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा 

 विषय. घरकुल योजना लाभार्थ्यांना वाळू मिळणे बाबत.

 महोदय. आपणास विनंती अर्ज करतो की नांदुरा शहरात रमाई आवास योजना /  प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत प्राप्त लाभार्थ्यांना वाळू देण्यात यावे  जेणेकरून घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यास मदत होईल.

 शासन निर्णय दि. 30 एप्रिल 2025 तसेच मंत्रिमंडळ निर्णय दि. 8 एप्रिल 2025 नुसार घरकुल पंतप्रधान योजनेतील प्राप्त तहसीलदार यांच्यामार्फत 10% मोफत वाळू वितरण अपेक्षित परंतु प्रत्यक्षात लाभार्थ्यांना वाढू वितरणामध्ये अडथळा न आणता लाभार्थ्यांना हक्काची वाढू वितरण करण्यात यावे ही विनंती माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन  दिनांक 2. 9.2025 रोजी मुकेश अशोकराव वाकोडे राहणार त्रिमूर्ती नगर नांदुरा खुर्द यांनी दिलेले आहे