ग्रामपंचायत खुमगाव मधील अंगणवाडी क्रमांक एक येथे आयुर्वेद दिवस साजरा - Maratha Darbar

Breaking

Tuesday, September 23, 2025

ग्रामपंचायत खुमगाव मधील अंगणवाडी क्रमांक एक येथे आयुर्वेद दिवस साजरा

 ग्रामपंचायत खुमगाव मधील अंगणवाडी क्रमांक एक येथे आयुर्वेद दिवस साजरा (अरुण सुरवाडे नांदुरा)






दिनांक 23/09/2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत खुमगाव बुट्टी येथील अंगणवाडी क्रमांक एक येथे राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा करण्यात आला तसेच 17सप्टे ते 2 ऑक्ट2025 पर्यंत सशक्त नारी अभियन सुरू  असून यामध्ये आयुर्वेदा विषयी माहिती वैदकिय आरोग्य अधिकारी डॉ प्रियंका बकाल यांनी दिली.

तसेच महिला सशक्तीकरण,योग,आहार विहार,हार्ट अटॅक सारख्या आपतकालीन वेळी काय करावं,प्रत्याशित घेऊन या विषयी माहिती योगाचार्य डॉ एस एस पाटील यांनी दिली या कार्यक्रमाला आशा सेविका,मदतनीस तसेच गावातील महिला मंडळीची  उपस्थित होती.