स्वातंत्र्यदिनी लक्षवेधक ठरली महात्मा फुले हायस्कूलची प्रभातफेरी* (सांस्कृतिक कार्यक्रमांचे शिस्तबद्ध प्रदर्शन). - Maratha Darbar

Breaking

Sunday, August 17, 2025

स्वातंत्र्यदिनी लक्षवेधक ठरली महात्मा फुले हायस्कूलची प्रभातफेरी* (सांस्कृतिक कार्यक्रमांचे शिस्तबद्ध प्रदर्शन).


*स्वातंत्र्यदिनी लक्षवेधक ठरली महात्मा फुले हायस्कूलची प्रभातफेरी* (सांस्कृतिक कार्यक्रमांचे शिस्तबद्ध प्रदर्शन).  
  
 निमगाव- सोपान पाटील.....
       येथील महात्मा फुले हायस्कूल निमगाव यांनी हरघर तिरंगा अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिन दि.१५ ऑगस्टला गावातील प्रमुख रस्त्यावरून काढलेली  देशभक्तीपर गीतांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांची प्रभात फेरी लक्षवेधक ठरली.                  महात्मा फुले हायस्कूल निमगाव येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत कवायत प्रात्यक्षिक , देशभक्तीपर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवनी समाधी निमित्त सामूहिक पसायदानाचे गायन करण्यात आले. या अभियानांतर्गत दिनांक १३ ते १५ ऑगस्टला संस्थेचे जेष्ठ संचालक तथा माजी मुख्याध्यापक ए .बी .पाऊलझगडे , अध्यक्ष के .आर. इंगळे, मुख्याध्यापक सुभाष राठोड व गावातील प्रतिष्ठित नागरिक आदींच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनी सकाळी आठ वाजे दरम्यान गावातील प्रमुख मार्गावरून प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीत ढोल पथक, देशभक्तीपर गीतांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके, भारत मातेचा व क्रांतिकारकांचा जय घोष. महापुरुषांच्या व क्रांतीकारकांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी ,   आदी लक्षवेधक ठरले. गावातील  संत सुपो महाराज मंदिर, संत सावता महाराज चौक, बजरंग दल ,छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा फुले चौक , रामदल चौक ,माता भवानी चौक व बसस्टॅन्ड परिसरात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करून उपस्थित गावकऱ्यांचे लक्ष वेधले.  प्रत्येक चौकात महापुरुष व क्रांतिकारक यांच्या  प्रतिमा व पुतळ्यांचे पूजन अध्यक्ष के. आर. इंगळे व मुख्याध्यापक सुभाष राठोड यांनी केले.गावकऱ्यांनी विविध चौकात विद्यार्थ्यांना चॉकलेट व बिस्कीटचे वितरण करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.   प्रभात फेरीच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सुभाष राठोड, प्रभारी पर्यवेक्षिका जयश्री भोपळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांमधील स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. शिस्तबद्ध व देशभक्तीपर गीतांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे सदर प्रभात फेरी लक्षवेधक ठरली.       (  निमगाव- लक्षवेधक देशभक्तीपर गीतांवर प्रात्यक्षिक सादरीकरण करताना महात्मा फुले हायस्कूल निमगाव चे विद्यार्थी)