अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व्दारा आरोग्य समिती च्या वतीने खामगाव सामान्य रुग्णालय समस्येने निवेदन**अन्यथा आंदोलनाचा इशारा* - Maratha Darbar

Breaking

Saturday, August 2, 2025

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व्दारा आरोग्य समिती च्या वतीने खामगाव सामान्य रुग्णालय समस्येने निवेदन**अन्यथा आंदोलनाचा इशारा*

 

मा. जिल्हा शल्यचिकित्सक साहेब, जिल्हा रुग्णा


लय बुलढाणा.


मार्फत :- वैद्यकीय अधीक्षक सामान्य रुग्णालय खामगांव.


अर्जदार :- सुरज एस. यादव खामगांव.


महात्मा ज्योतिबा फुले उपजिल्हा सामान्य रुग्णालय खामगाव येथे रुग्णांना नियमानुसार उपचार मिळणे बाबत


मा. महोदय,


या निवेदनाद्वारे आपल्या निदर्शनात आणून देण्यात येते की बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असलेला खामगांव उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील वार्डा मध्ये भरती असलेले गरीब आणि गरजू रुग्णांना डॉक्टर कोणत्याही प्रकारची तपासणी न करता तोंडी उपचार देत आहेत.  तसेच वार्डात मॉनिटर, बिपी, ऑपरेटर, इसीजी मशीन उपलब्ध नाही. रुग्णांना उपचार पाहीजे तसा मिळत नाही  शेवटी नाईलाजाने रुग्णांना खासगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागते फक्त परिचारिका यांच्या भरवश्यावर सामान्य रुग्णालय चालत आहे म्हणून रुग्णांची योग्य व संपूर्ण तपासणी करून योग्य सल्ला देण्यात यावा  तसेच अनेक रुग्णांना फक्त त्यांच्या आरोग्याच्या समस्येबद्दल विचारून तोंडी औषधी लिहून देण्यात येते. ही खूप गंभीर आणि धोकादायक बाब आहे. गरीब आणि गरजू लोकांच्या जीवनाशी खेळण्याचा हा एक धोकादायक प्रकार सुरू आहे. रुग्णालयात अशा अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. आम्हाला मिळालेल्या तक्रारीवरून समजले की वॉर्ड मध्ये इंचार्ज डॉक्टराची एकच वेळ फेरी होते पाहीजे तशी दोन वेळ  शासकीय परीपत्रका नुसार होत नाही फक्त एकच भेट रुग्णांना देण्यात येते. वॉर्डमधील डॉक्टरांनी नियमाप्रमाणे किमान दोन वेळा नियमित भेट देऊन रुग्णांची प्रकृतीची तपासणी केली पाहिजे पण तसे होत नाही. रुग्णांच्या जीव धोक्यात आल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी आपली राहील. म्हणून, आपणांस विनंती आहे की आमच्या तक्रारीची गंभीरपणे दखल घेऊन ओपीडी मधील रुग्णांची योग्य व संपूर्ण तपासणी करावी व तसेच नवीन शिकाऊ डॉक्टर यांच्या सोबत सिनियर डॉक्टरला बसवायला पाहीजे  ओ पी डी मध्ये व लवकरात लवकर फिजिशियन, बालरोग तज्ञ्, प्रसूती स्त्री रोग तज्ञ्, दंत रोग तज्ञ् हे लोकं कधीच बसत नाही ओ पी डी मध्ये यांनी पण तिथं दररोज बसायला पाहीजे असे न झाल्यास आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने सामान्य रुग्णालय खामगांव समोर मोठे आंदोलन छेडण्यात येईल याची सर्वश्री जवाबदारी प्रशासनाची राहील याची दखल घ्यावी.




धन्यवाद.