* *
शेगाव येथील आशिर्वाद गेस्ट हाऊस मधील देहव्यापारावर छापा*
शेगाव : सोपान पाटील
येथील इकबाल चौकात असलेल्या आशिर्वाद गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या देह व्यापारावर शहर पोलिसांनी २४ जुलै रोजी छापा टाकून २ आरोपींना अटक करीत पीडित महिलेची सुटका केली आहे.
याबाबत पो.उप. नि. कुणाल जाधव, पोलीस स्टेशन शेगाव शहर यांनी फिर्याद दिली की, गोपनीय खबरे प्रमाणे पोस्ट ऑफ व पंचासमक्ष अनैतिक व्यापार संबंधाने आशिर्वाद गेस्ट हाऊस मध्ये रेड केली असता
आरोपी नामे शाहरुख शेख रहमान वय ३० वर्ष रा. वरखेड याने आशीर्वाद गेस्ट हाउसमध्ये महिलांना देह व्यापार करता आणून त्यांच्याकरिता गिऱ्हाईक आणून पीडित महिलेकडून देह विक्रीचा व्यवसाय करून घेत त्यांचे मोबदल्यात पैसे स्विकारले आहे.
तसेच आरोपी घटनास्थळी आशीर्वाद गेस्ट हाऊसचे रूममध्ये पीडितासोबत ग्राहक म्हणून मिळून आला आहे. त्याच्या ताब्यातून नगदी १५२० इतर साहित्य १०,२३१ रू. असा एकुण ११
हजार ७५१ रू. अंगझडतीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तरी नमूद आरोपी याचे हे कृत्य कलम ३,४,५ अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ अन्वय होत असल्याने अशा लेखी फिर्याद वरून आरोपी शाहरुख शेख (मॅनेजर) वय ३० वर्ष, अंकुश पंढरी धांडे हा वय ३७ वर्ष (ग्राहक) दोन्ही रा. वरखेड या दोघांवर कलम ३,४,५ अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ नुसार गुन्हा दाखल केला पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील करीत आहे.
