ग्रामपंचायत कार्यालय नारखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिराची माहिती नसल्याने शेतकरी गोरगरीब जनतेची नाराजी
गजानन डाबेराव
तालुका प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा:- नांदुरा महसूल विभागात येत असलेले नारखेड ग्रामपंचायत कार्यालयात दि ४जून २०२५ बुधवार रोजी सकाळी ११ वाजता बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून दत्तक ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेतलेले नारखेड येथे नांदुरा महसूल विभागाअंतर्गत क्षत्रिय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य गोरगरीब जनता शेतकरी वर्ग महिला विद्यार्थी यांचे दैनंदिन प्रश्नांचे निष्कारण व जनतेच्या तक्रारी तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख व कार्यक्रम गतिमान करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून दत्तक ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेण्यात आलेल्या नांदुरा तालुक्यातील नारखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये संजय गांधी निराधार योजना श्रवण बाळ योजना पी एम किसान योजना शेतकरी फार्मर आयडी राशन कार्ड आधार कार्ड नवीन मतदान कार्ड सलोखा योजना फळबाग सिंचन साधने अशा विविध योजना पुरविण्यात येणार आहे. अशा विविध योजनांची माहिती देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असताना अधिकारी कर्मचारी ग्रामीण जनतेला याची माहिती देत नसल्यामुळे ग्रामीण भागात राहणारा शेतकरी गोरगरीब जनता अशिक्षित असल्यामुळे त्यांना शासनाच्या योजनांची माहिती होत नाही असाच प्रकार नारखेड येथे घडला आहे. येथे आदिवासी दलित समाज हा सर्वात जास्त प्रमाणात राहत असल्यामुळे अशिक्षितांचे प्रमाण जास्त आहे. योग्य माहिती मिळत नसल्यामुळे शासनाच्या योजना पासून वंचित राहावे लागत लागत आहे. अनेक नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालय जाऊन कर्मचारी अधिकारी यांना योजनेची शिबिराची माहिती विचारली असता आम्ही मोबाईलवर मेसेज टाकलेला आहे असे सांगितले काहींनी विचारले की दवंडी द्यायला पाहिजे होती आम्ही दवंडी देऊ शकत नाही असे उडवाउडवी चे ची उत्तरे देण्यात आली . ग्रामीण भागात राहणारी गोरगरीब जनता मोल मजुरी करून पोट भरतात त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळे माहिती मिळाली नाही. तसेच येथील सरपंच वगळता इतर ग्रामपंचायत पदाधिकारी यांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिराची माहिती नाही. अजूनही अनेक आदिवासी जनतेकडे तसेच दलित समाजाकडे रेशन कार्ड जातीचा दाखला नसल्यामुळे शासनाच्या योजनेचा लाभ घेता येत नाही. या शिबिराला महसूल विभागाचे मंडल अधिकारी पाटील साहेब तलाठी तडवी मॅडम संजय गांधी निराधार विभागाचे मेटांगे साहेब कोतवाल वर्षा डाबेराव आरोग्य विभागाच्या डॉ.चंदनगोळे ताई यांची उपस्थिती होती. बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील साहेब यांची दत्त ग्राम संकल्पना योजना चांगली आहे तरी अधिकारी कर्मचारी यांनी नारखेड येथील जनतेपर्यंत योजनेची माहिती पोहोचली नसल्यामुळे येथील जनतेमध्ये नाराजीचा रोष व्यक्त करण्यात आला.. तरी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील साहेब उपविभागीय अधिकारी साहेब मलकापूर व नांदुरा तहसीलदार साहेब यांनी जातीने लक्ष घालावे. छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिराला आलेल्या कर्मचारी व अधिकारी यांच्यावर काय कारवाई करतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
