तहसीलदार यांचे वसुली मास्टर अडचणीत! वसुलीचे पुरावे असल्याने अडकले अडकीत्त्यात ! विश्वासू चालकांची गोची - Maratha Darbar

Breaking

Saturday, February 15, 2025

तहसीलदार यांचे वसुली मास्टर अडचणीत! वसुलीचे पुरावे असल्याने अडकले अडकीत्त्यात ! विश्वासू चालकांची गोची

 तहसीलदार यांचे  वसुली मास्टर अडचणीत!

वसुलीचे पुरावे असल्याने अडकले अडकीत्त्यात !

विश्वासू चालकांची गोची 


मलकापूर प्रतिनिधी :- 

मलकापूर तालुक्यात "महसुल" विभागाच्या स्थानिक यंत्रणा अगोदरच बहुचर्चित ठरल्याने विविध घटना कारनामे यांनी वेळोवेळी गाजत आहे. यात आता त्यांच्या विश्वासू  शासकीय, खाजगी चालकाची अवैध वाळू, बायोडिझेल माफीयांच्या  सोबत तहसीलदार राहुल तायडे यांचे विश्वासू शासकीय, खाजगी चालक यांचे पराक्रम बाहेर आले आहे.अवैध धंदे असलेल्या माफीया च्या सोबत असलेल्या त्यांच्या संबंधाची चौकशी करण्या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांच्या कडे ११ फेब्रुवारी मुन्ना राठोड यांनी  तक्रार दाखल केली आहे.या गंभीर तक्रारी ने   महसुल विभागातील अधिकाऱ्यांच्या  कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 *काय आहे तक्रारीत* 

 तहसिलदार मलकापूर यांचे शासकिय वाहन चालक व खाजगी वाहन चालक यांचे वाळू तस्करी व बायोडिझेल  माफीयांसोबतचे संबंध असल्याचा बॉम्ब गोळा तक्रारीमधून टाकण्यात आला आहे. तहसीलदार राहुल तायडे यांचे शासकीय चालक दिलीप तायडे  यांचे वाळू तस्करां सोबत डायरेक्ट  संबंध आहे. असा थेट आरोप राठोड यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर या साट्यालोट्याचे अनेक   ठोस पुरावे सुध्दा आहे. यामध्ये फोन पे वरील व्यवहार , हॉटेल वरील पार्टी , कॉल रेकॉरडींग आदि पुराव्यंचा समावेश असून आपल्याकडे हे पूरावे असल्याचे तक्रार दाराने तक्रारीत नमूद केले आहे 

दुसरीकडे दिलीप तायडे हे प्रत्येक वाहनांकडून दर महा दहा हजार रूपये जमा करण्याचे काम करत आहे . त्यामुळे वाळू , 

मुरूम , पकडून 100 ते 200 गाडया, रेशन धारक यांच्या वसुलीचे  कामही तहसीलदार राहुल तायडे यांचे खासमखास  चालक दिलीप तायडे हे करीत  आहे. चालक दिलीप तायडे  मलकापूर तहसिलमध्ये 12 ते 15 वर्ष पासून कार्यरत  असून त्यांचे येथील सर्व वाळू तस्कर व बायोडीझल,रेशन माफीया यांचे जवळचे हित संबंध बनलेल आहेत अश्या आशयाची तक्रार उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांच्या कडे करण्यात आले आहे.


चौकट....

*शासकीय चालकाचा मोबाईल 'साक्षीदार' देणार का?*

तहसीलदार राहुल तायडे यांच्या विश्वासु चालक दिलीप तायडे यांचा मोबाईल सांभाव्य चौकशीत महत्वाचा घटक ठरु शकतो. मोबाईलचे  सिडीआर , डिव्हिआर रेकॉर्ड काढले तर या मध्ये त्यांचे अनेक  माफीयांसोबतचे  हित संबंध समोर येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

चालक हा परस्पर रेतीची गाडी ट्रॅक्टर पकडतो व ती तिथल्या तिथेच 10 ते 15 हजार घेवून सोडून देतात. चालक दिलीप तायडे यांची 'बदली झाली असूनही अजुनही मलकापूर  येथे कार्यरत कसे'? असा सवाल ही तक्रारीतून उपस्थित करण्यात आला आहे. 


चौकट...

 खाजगी चालकही चर्चेत!

या प्रकरणात तहसीलदार राहुल तायडे यांचा खाजगी चालक मनोज  वानखेडेचा ही तक्रार मध्ये उल्लेख केला आहे, हे विशेष. ते ही या प्रकरणी वसुली मास्टर म्हणून चर्चेत आले आहे.

 खाजगी वाहन चालक मनोज वानखेडे आठवडयामध्ये 2 ते 3 ट्रॅक्टर रेती , गाडी यांनी संगतमत करून परस्पर सोडवल्या आहे. या मुळे ते देखील या प्रकरणी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.