जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जि.प.मराठी मुलांची शाळा चिंचखेड खु येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.......... - Maratha Darbar

Breaking

Sunday, January 26, 2025

जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जि.प.मराठी मुलांची शाळा चिंचखेड खु येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न..........

 २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जि.प.मराठी मुलांची शाळा चिंचखेड खु येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न..........


मुक्ताईनगर (प्रतिनिधी) संदीप घाईट:-जि.प.मराठी मुलांची शाळा चिंचखेड खु येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते.प्रथम राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देऊन.पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढण्यासाठी तसेच मुलांना शाळेची आवड निर्माण ह्वावी.तसेच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कला गुण ओळखण्यासाठी व उत्साह वाढण्यासाठी अशा नवनविन कार्यक्रमांचे आयोजन शाळेतील शिक्षक मंडळी करत असतात . यामध्ये गावकरी मंडळी उत्साहाने कार्यक्रमाचा आनंद घेतात व त्याठिकाणी शिक्षकांना सहकार्य करत असतात.विद्यार्थिनी आपल्या अंगी असलेले कला गुणांचे उत्तम असे सादरीकरण राष्ट्रभक्तीतुन केले.यावेळी शिक्षक धनवंत अहिरराव सर पांडे सर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,मा‌.सरपंच मा.ग्रा.पं.सदस्य तसेच गावकरी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.