*एकनिष्ठा फाउंडेशन कडून गरजू रुग्णांना आर्थिक मदद* - Maratha Darbar

Breaking

Wednesday, September 11, 2024

*एकनिष्ठा फाउंडेशन कडून गरजू रुग्णांना आर्थिक मदद*



 *एकनिष्ठा फाउंडेशन कडून गरजू रुग्णांना आर्थिक मदत*

*(सिध्देश्वर निर्मळ खामगांव)

*दिनांक 12/09/2024*

खामगांव :- येथील रुग्णसेवेत सदैव अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा गौ - सेवा रक्तसेवा फाउंडेशन कडून रुग्णांना खामगांव आणि शेगांव येथे प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन आर्थिक मदत करण्यात आली. रुग्ण विवेक कृष्णराव देशमुख राहणार मिरा नगर खामगांव यांची परिस्थिती नाजुक असल्यामुळे त्यांचा एक हात एक पाय काम निकामी झाल्याने त्यांना पुढच्या उपचारासाठी रोख 12,100 बारा हजार शंभर रुपयाची आर्थिक मदत औषधोपचार करण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष देण्यात आली. तसेच अपघातात जखमी झालेले रुग्ण संतोष दिलीप भराटे राहणार शेगांव यांना चालणे खुप कठीण होत होते त्यांची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांना एकनिष्ठा फाउंडेशन तर्फे 1,500 पंधराशे रुपये किमतीचे नवीन वाकर देऊन आर्थिक मदत शेगांव येथे जाऊन करण्यात आली. या सेवा मदत कार्यासाठी एकनिष्ठा फाउंडेशनचे सुरजभैय्या यादव, हरीष पंजवानी, ज्ञानेश सेवक सर, किशोर वाघ, अनिल बिस्सा, सौ.लता गावडे, अनिरुद्ध पाटील, ऋषी तंबोले, सिद्धेश्वर निर्मळ, पंकज अंबारे, चि. समन्यू यादव आदि लोकांनी परिश्रम घेऊन एकनिष्ठा फाउंडेशन तर्फे आर्थिक मदत केली.