*मा. शिवश्री नागेश जायले साहेब धामनगाव बढे येथील ए पी आय ठानेदार यांनी आपला "वाढ दिवस केला मनोरुग्नांना मदत करुन साजरा"* आपल्या वाढदिवसा निमीत्य पळसखेड सपकाळ येथील पीडित बेघर मनोरुग्ण यांचा सांभाळ करणारी संस्था डॉक्टर श्री पालवे यांच्या सेवा संकल्प आश्रम येथील मनोरुग्णांना आपल्या वाढदिवसा निमित्ताने जेवन दिले.
साहेबांनी बोलतांना सांगीतले हा माझ्या जिवनातील अनमोल व न विसरनारा जन्म दिवस राहील तेथे गेले असता एका बाजूला आनंदही झाला व दुसऱ्या बाजूला मनही भरून आले कारण ज्यांना कोणी नाही त्यांना आपण एका दिवसाचे का होईना त्यांना जेवण देऊन मनाची तृप्ती करू शकलो. आश्रमा मधे आज रोजी २७५ मनोरुग्ण आहेत आपण कोण व काय आहोत हे जर पाहायचे असेल तर एक वेळ नक्की या आश्रमाला भेट द्या आपले सर्व दुःख निघून जाईल. यामध्ये श्री विजय साबळे पाटील, खैरा येथील माजी सरपंच रविभाऊ मापारी , खैरा शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय रिंढे सर ,श्री राहुल वखरे रायटर सुरज रोकडे व सेवा संकल्प येथील डॉक्टर पालवे साहेब त्यांचे वडील सर्व आश्रम ला मदत करणारी मंडळी उपस्थित होती🙏

