*दुचाकी स्वाराने राहगिरास उडवले* *एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू* पिंपळगाव सराई येथील घटना - Maratha Darbar

Breaking

Friday, May 24, 2024

*दुचाकी स्वाराने राहगिरास उडवले* *एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू* पिंपळगाव सराई येथील घटना


 *दुचाकी स्वाराने राहगिरास उडवले* 

 *एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू*       */ मोताळा प्रतीनिधी अफसर भाई*


 **पिंपळगाव सराई येथील घटना* 

प्राप्त माहितीनुसार सदर घटना ही

22 मे 2024 रोजी रात्री सोनेवाडी येथे घडली त्यात भरधाव दुचाकी ने दिलेल्या धडकेत सोनेवाडी येथील युवक देविदास गजानन काळे रा. सोनेवाडी वय अंदाजे 23 वर्षे याचा जागेवरच दुर्दैव मृत्यू झाला असून त्याच्यासोबत असलेला शुभम तायडे हे बुधवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास काही कामानिमित्त सोनेवाडी जवळील सिमेंट रस्त्याने पायी जात होते त्याच दरम्यान त्यांना भरधाव वेगाने येणारी दुचाकी क्रमांक एम एच २८ बी एफ ५४९८ जबर व जोरदार धडक दिली सदर दुचाकी वाहन हे ट्रिपल सीट होते दुचाकी चालक मनोज विलास जाधव रा हातेडी याने सदर दुचाकी वाहन ट्रिपल सीट भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवत देविदास काळे याला धडक दिली त्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला

याप्रकरणी आरोपी मनोज जाधव विरुद्ध रायपूर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास रायपूर पोलीस करत आहे