बुलडाणा लोकसभेसाठी ५२.८८ टक्के मतदान शेगांव मध्ये
मतदान प्रकिया शांततेत,
उमेदवाराचे भवितव्य मतदानपेटीत बंद, आता प्रतिक्षा निकालाची
शेगांव प्रतिनिधी संजय सुरवाडे
भारत देशातील सर्वात मोठी निवडणुक म्हणजे लोकसभा होय .
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असून आज दि.२६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात असलेले बुलडाणा लोकसभा मतदार संघासाठी निवडणुक प्रकिया शांततेत पार पडली. सकाळी ७ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान शांततेत पार पडले. मतदानाची एकुण टक्केवारी जवळपास ५२.८८ एवढी होती.
जगातील सर्वात मोठी लोकशाही नांदत असलेल्या आपल्या भारत देशात लोकशाहीचा उत्सव सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यात पश्चिम विदर्भातील अमरावती यवतमाळ-वाशिम, अकोला, बुलडाणा, वर्धा या मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पडली.
बुलडाणा मतदार संघात आज मतदारांनी आपला हक्क बजावला एकुण २१ उमेदवार निवडणुक रिंगणात उभे होते.
यामध्ये प्रमुख पक्ष म्हणुन शिवसेना दोन्ही गट एकमेकांसमोर लढत आहेत. तर अपक्ष उमेदवारही आपले भाग्य आजमावत आहेत. गेल्या महिनाभरापासून प्रचाराची रणधुमाळी सुरु होती. सर्वच राजकीय पक्षांनी आपआपल्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा घेवून सकारात्मक वातावरण निर्मितीचे प्रयत्न केले व मतदारांच्या पसंतीला उतरुन मतदान कसे मिळेल यासाङ्गी प्रयत्न केले. यांच्या प्रयत्नांना कितपत यश येईल हे निकालांअतीच कळेल. २१ हि उमेदवारांचे भवितव्य आज सायंकाळी ६ वाजता
मतपेटीत बंद करण्यात आल्या
आता सर्व उमेदवारांना प्रतिक्षा असेल ती ४ जुन ची. विजयाची माळ कोणाच्या गळयात पडेल हे ४ जूनच्या निकालानंतर कळेलच तोपर्यंत सर्वजण आपले विजयाचे गणित जुळविण्याचे प्रयत्न करतील आपआपल्या परिने अंदाज व्यक्त करुन खमंग चर्चा करुन व्यस्त राहतील. शेगांव मध्ये रविकांत तुपकर यांचा पाना व खेडेकर यांची मशाल जास्त चालल्याची चर्चा आहे

