उद्या पद्मश्री ऍड उज्वल निकम यांच्या हस्ते ऍड सुधाकर दळवी यांच्या नांदुरा येथील विधी कार्यालयाचे उदघाटन . - Maratha Darbar

Breaking

Thursday, October 6, 2022

उद्या पद्मश्री ऍड उज्वल निकम यांच्या हस्ते ऍड सुधाकर दळवी यांच्या नांदुरा येथील विधी कार्यालयाचे उदघाटन .


उद्या पद्मश्री ऍड उज्वल निकम यांच्या हस्ते ऍड सुधाकर दळवी यांच्या नांदुरा येथील विधी कार्यालयाचे उदघाटन .

गजानन डाबेराव
मराठा दरबार न्यूज
कार्यकारी संपादक बुलढाणा


नांदुरा ,:- विशेष सरकारी अभियोक्ता पद्मश्री ऍड श्री उज्वल निकम यांच्या हस्ते उद्या दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता ऍड सुधाकर दळवी यांच्या मलकापूर रोडवरील वॉर्ड न 2 मधील पी एम टॉवर मधील विधी कार्यालायाचे उदघाटन होत आहे.
       बुलढाणा जिह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणारा केंद्र शासन पुरस्कृत व अर्थसहाय प्राप्त महाराष्ट्र शासनाचा सिंचनाचा अनुशेष दूर करणारा खारपान पट्ट्यात हरितक्रांतीचे स्वप्न पल्लवीत करणारा विदर्भात दुसरा मोठा जिगाव प्रकल्प प्रस्तावित केला आहे, त्यातून शेतकरी समृद्ध व्हावा याकरिता नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे भूमिपुत्र शेतकऱ्यांची घरे व जमिनी संपादित होत असल्याने त्यांना कायदेशीर व समुपदेशन आणि सहकार्य करण्यासाठी या विधी कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करीत आहोत.शासन आणि प्रकल्प बाधितांचा समन्वय साधून आम्ही प्रकल्पग्रस्तांचा भूसंपादन आणि पुनर्वसनाचा मार्ग सुलभ  करण्यालाच प्राधान्य देत आहोत आणि यापुढेही आम्ही आमच्या कार्यलयाच्या माध्यमातून तसा प्रयत्न करणार आहोत.सदर विधी कार्यालयाच्या उद्घाटनाचे अध्यक्ष ऍड श्री आशिष देशमुख हे राहणार असून या सोहळ्याला विधी क्षेत्रातील अनेक गनमान्य व्यक्ती तसेच राजकीय,सामाजिक, शेतकरी बांधव आणि प्रकल्प बाधित सुद्धा उपस्थित राहनार आहेत.आपल्या हिताचा आणि सर्वांगीण विकासाचा आमचा प्रयत्न असल्याने चुकून आम्ही आपल्या पर्यंत पोहोचलो नसल्यास आपण या आमच्या विधी कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्याला आवर्जून उपास्थित राहावे असे विधी कार्यालयाच्या वतीने ऍड सुधाकर दळवी,सौ सोनाली सुधाकर दळवी,ऍड अमित पाटील,ऍड अनंता देशमुख यांनी आवाहन केले आहे .