कॅन्सर पीडित रुग्णांना 1500 ऐवजी 3500 वाढीव शासकीय मदत मिळावी. समाजसेवक बिस्मिल्ला पठाण यांची मागणी
नांदुरा..... सोपान पाटील
कॅन्सर पिडीत रुग्णांना मदत रक्कम वाढीव मिळणेबाबत.
शासन मार्फत अपंग लोकांना प्रति महिना 2500/- खर्च सहाय्यता मिळते. त्याच प्रमाणे कॅन्सर पिडीत रुग्णांना प्रति महिना 1500/-आणि निराधार वृध्दांना सुध्दा 1500/- रुपये प्रति महिना सहाय्यत मिळते. त्याच प्रमाणे आम्ही विनंती करु इच्छीतो की, ज्याप्रमाणे अपंग रुग्णांना 2500/- रुपये सहाय्यता मिळते ह्याच प्रमाणे कॅन्सर पिडीत, ब्लेंड कॅन्सर, हॉस्पीटलाईझ, किडणी फेलीअर लिव्हर फेलीअर, हिमोपिलीया अशा प्रकारचे रुग्न ज्यांचे वय अतिशय अल्प 4 ते 5 वर्ष असते खऱ्या अर्थाने अशा रुग्णांना जास्तीत जास्त सहाय्यता निधी मिळणे आवश्यक आहे.तरी
वरील आजार ग्रस्त रुग्नांना सुध्दा 1500/- एवजी वाढवुन 3500 रुपये सहाय्यता मिळावी याकरिता आज नांदुरा तहसील कार्यालय ला निवेदन देण्यात आले,
सदर निवेदन देते वेळेस नांदुरा येथील प्रसिद्ध समाजसेवक बिस्मिल्ला खान पठाण, लेखणी शस्त्र मुख्य संपादक सरदार शेख, रायगड स्वाभिमानचे कार्यकारी संपादक, मराठा दरबार उपसंपादक सोपान पाटील, महाराष्ट्र नीती वृत्तपत्राचे विशेष प्रतिनिधी राहुल चोपडे, नांदुरा एक्सप्रेस न्युज चे मुख्य संपादक राजीक शेख,कलीम भाई,अहमद खान पठाण व इतर समाजसेवक आणि असंख्य पत्रकार बंधू यावेळेस उपस्थित होते
