नांदुरा तालुक्यातील अवधा बु. या गावाचा नदीच्या पुरामुळे संपर्क तुटला* - Maratha Darbar

Breaking

Wednesday, September 17, 2025

नांदुरा तालुक्यातील अवधा बु. या गावाचा नदीच्या पुरामुळे संपर्क तुटला*

 *नांदुरा तालुक्यातील अवधा बु. या गावाचा नदीच्या पुरामुळे संपर्क तुटला*






अवधा बु.... सोपान पाटील 

 नांदुरा तालुक्यातील अवधा बु. या गावाचा ज्ञानगंगा नदीच्या पुरामुळे संपर्क तुटला आहे. शासन व प्रशासन हे या गावाला कुठल्याही प्रकारची वारंवार सूचना देऊनही मदत करत नाही. तसेच शाळकरी मुलांचे व वयोवृद्ध लोकांचे खूप हाल होत आहेत. कोणतेही लोकप्रतिनिधी  या गावाला भेट सुद्धा देत नाही. तरी प्रशासनाने या गावाला अवश्य भेट देऊन जनतेच्या समस्या सोडवा नांदुरा तालुक्यातील अवधा बु. या गावाचा ज्ञानगंगा नदीच्या पुरामुळे संपर्क तुटला आहे. शासन व प्रशासन हे या गावाला कुठल्याही प्रकारची वारंवार सूचना देऊनही मदत करत नाही. तसेच शाळकरी मुलांचे व वयोवृद्ध लोकांचे खूप हाल होत आहेत. कोणतेही लोकप्रतिनिधी  या गावाला भेट सुद्धा देत नाही. तरी व्या. शासनाने अवधा बु या गावाला वाऱ्यावर सोडले आहे।   .*अवधा बुद्रुक येथे मुसळधार पावसामुळे नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला त्यामुळे अवधा बुद्रुक व अवधा खुर्द चा संपर्क तुटला अवधा बुद्रुक मध्ये मोठ्या प्रमाणात टायफेटचे पेशंट असल्यामुळे गावकऱ्यांनी संतोषभाऊ डिवरे यांच्याशी संपर्क केला व मदतीची अपेक्षा व्यक्त केली व संतोषभाऊ डिवरे यांनी क्षणाचाही विलंब न करता अवधा बुद्रुक गावाची पुरपरिस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली व ताबडतोब तिथे मेडिकल टीम पाठवण्याची विनंती केली व त्यांनी सुद्धा लगेच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता तिथे आरोग्य केंद्राची पूर्ण टीम व ॲम्बुलन्स पाठवले व डॉक्टरांना स्वतः संतोष भाऊ डिवरे हे पुलाच्या पाण्यातून डॉक्टर साहेबांना अवधा बुद्रुक मध्ये घेऊन गेले व सोबत मेडिकल किट त्याबद्दल सर्व गावकऱ्यांनी संतोष भाऊ डिवरे डॉक्टर श्याम चंदनगोळे, आरोग्यसेवक संजय सातव व नर्स मिनल मनोहर इंगळे,सर्व आशा,रेखा इंगळे अंगणवाडी सेविका अर्चना इंगळे यांनी मदत केली.यांच्या हिम्मतीचे व त्यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेबद्दल कौतुक केले*