*
नांदुरा तालुक्यातील वडी ते पिं खुटा धांडे रस्त्यांची दुर्दशा ठेकेदार यांनी रोडचे डांबर रोडवर कमी प्रमानात वापरुन बाकी उरलेले डांबर घातले खिशात* :[8/8, 7:19 PM] सोपान पाटील: नांदुरा तालुक्यातील वडी ते पिंपळखुटा धांडे या डांबरीकरण रस्ताचे बोगस काम करनाऱ्या ठेकेदार मुकुंद याच्यावर कारवाईची मागणी? संपूर्ण गावकरी त्रस्त
[8/8, 7:44 PM] (सोपान पाटील: नांदुरा )तालुक्यातील
वडी ते पिं. खुटा धांडे या जोडरस्त्यांची अवस्था पाहता रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी झाली आहे. हे खड्डे केवळ वाहनचालकांसाठीच नाही, तर पादचायाँसाठी सुध्दा धोकादायक बनले आहेत.या रोडचे दोन वर्षा अगोदर काम पूर्ण झालेलं आहे या रोडचे ठेकेदार श्री. मुकुंद यांनी अत्यंत बोगस मटेरियल वापरून या रस्त्याचे काम केले आहे. यांच्यावर कारवाई ची मागणी संपूर्ण गावकरी करत आहेत अस्या भ्रस्ट ठेकेदार विरुद्ध शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे.प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे याचा त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. मात्र रस्त्यांवर पडलेले खड्डे पाहता याचा त्रास अधिकच त्यांना सोसावा लागणार आहे. त्याचप्रमाणे आबालवृद्ध्द व विद्यार्थ्यांना
या रस्त्यावरून जातांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून रस्त्यांवरील पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघातही घडण्याच्या घटना घडत आहेत. या रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत
प्रशासनाला सांगूनही कुठलीच दखल घेण्यास तयार नाही. त्यातच लोकप्रतिनिधी यांनीतर नागरिकांना जणू वार्यावरच सोडल्यागत परिस्थिती निर्माण झाली आहे.तर लोकप्रतिनिधी हे जनतेच्या मुलभूत सुविधांकडे लक्ष देत नाही. रस्त्यांची तात्काळ दुरूस्ती करण्याची मागणी केली. याबाबत तातडीने उपाययोजना न झाल्यास रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये बेशरमचे झाड लावून वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात येईल, असा इशाराही गावकरी यांनी दिला.
याप्रसंगी गावातील शिलानंद वाकोडे ग्राम सेका उपाअध्यक्ष, यशवंत वाकोडे - माजी सरपंच,दिनेश भास्कर घाटे पोलीस पाटील,भास्कर वाकोडे वडी,महादेव घाटे वडी
,शंकर वाकोडे पिं. धांडे,निवृत्ती बाठे,
नितीन वाघ -वडी,
प्रणव वाकोडे पिं. धांडे व अन्य गावकरी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच अ.भा.पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष सोपान पाटील, पत्रकार उमाताई बोचरे,पत्रकार शिलानंद वाकोडे व इतर सर्व उपस्थित होते..
