खातखेड येथे ताश पत्त्यावर छापा
नांदुरा...... सोपान पाटील
खातखेड येथील लक्ष्मण झांबरे यांच्या टिनशेड समोर ताशपत्ता सुरु असल्याची माहिती नांदुरा पोलिसांना मिळताच पोलिसांनी सुरु असलेल्या ताशपत्त्यावर छापा टाकून १० जणांना पकडले. ही कारवाई २१ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजता केली.
अक्षय सुवर्णसिंग ठाकूर (२४) रा.पंचवटी नांदुरा खुर्द, वैभव बळीराम इंगळे (२३) रा.अंबोडा, पांडुरंग शालिग्राम वानखडे (३६) रा.आसलगाव ता.जळगाव जामोद, शैलेश तुकाराम नागलकर (४०) रा. नांदुरा, अतुल एकनाथ खंडारे (३७) रा.नांदुरा, अंकुश अजाबराव (२५) रा. वार्ड नं. १ नांदुरा, जगदीश लक्ष्मण झांबरे (३०) रा.नांदुरा खुर्द, गणेश विठ्ठल वनारे रा. ज्ञानगंगापूर, सचिन
मधुकर भावसार (३८) रा.सवडत ता.सिंदखेडराजा, दत्ता राखोंडे (३८) रा. नांदुरा खुर्द हे उपरोक्त ठिकाणी ताशपत्ता खेळताना पोलिसांना मिळून आले. त्यांच्याकडून नगदी ४६ हजार ४०० रुपये व जुगाराच्या डावावर असलेले ५१०० रुपये असा एकूण ५१ हजार ५५० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
पीएसआय घाटोळ यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वरील दहा आरोपींविरुध्द कम १२ अ नुसार गुन्हा दाखल केला.
