नांदुरा तालुक्यातील अवैध व्यवसाय बंद करण्यात यावे ? नवीन तहसीलदार साहेब व नवीन ठाणेदार साहेब येऊन काहीच फरक नाही?
(नांदुरा सोपान पाटील)
नांदुरा तालुक्यात होणारे अवैध धंदे खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. नांदुरा तालुक्यातील सर्रासपणे वरली मटका, दारू, गांजा, व नद्यामधील वाळू चोरी सर्रास चालू आहे. याकडे नादुरा पोलीस स्टेशन व नांदुरा तहसीलदार हे कोणतीच कारवाई करताना दिसत नाही. याला कोण जबाबदार असे नागरिकाच्या मनात रोष व भीतीचे वातावरण निर्माण होत आहे वाळू वाहतुकीमुळे कित्येक वेळा अपघात होऊन कीतीतरी लोकांचा जीव गेला हे अवैध
व्यवसाय त्वरित बंद करण्यात यावे व तालुक्यातील नागरिकांना न्याय द्यावा. नांदुरा तालुक्यातील अनेक गावामधून खूप मोट्या प्रमाणात वाळू वाहतूक सुरु असून पोलीस स्टेशन चे काही कर्मचारी हे फक्त हप्ते वसूली करतात. अशा भ्रष्ट कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. व सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावे तसेच अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या करणाऱ्या वर कडक कारवाई करण्यात यावी

