गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा माटरगाव बु येथे भरारी ग्राम संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी 21/05/2025 रोजी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले, - Maratha Darbar

Breaking

Thursday, May 22, 2025

गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा माटरगाव बु येथे भरारी ग्राम संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी 21/05/2025 रोजी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले,

 (संपादक राजु पाटील घाटे)


गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा 

माटरगाव बु येथे भरारी ग्राम संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी 21/05/2025 रोजी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले, यामध्ये जि.प. हायस्कूल माटरगाव येथील दहावीची विद्यार्थिनी कु. राधिका कोरडे हिने 94% तर पूर्ण कला महाविद्यालय माटरगाव येथील विद्यार्थिनी कु. लक्ष्मी लोनाग्रे हिने 84% गुण प्राप्त करून उत्कृष्ट यश मिळविल्याबद्दल त्यांचा सत्कार भरारी ग्राम संघाच्या सचिव उषाताई गायकी कोषाध्यक्ष गोदावरीताई यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन करण्यात आला. सर्व गुणवंतांचे अभिनंदन करण्यात आले, व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाबद्दल प्रोत्साहन देणे व प्रेरणा देणे हा आहे. या कार्यक्रमास भरारी ग्राम संघाचे पदाधिकारी, ICRP ज्योतीताई जगताप , सुनीताताई नागपुरे प्रीतीताई गुळभेले, रुक्मिणी ताई नागपूरे व सर्व सदस्य उपस्थित होत्या..