*पोलीस स्टेशन नांदुरा हद्दीतील शाळा व कॉलेज चे मुख्याध्यापक व प्राचार्य यांची पोलीस स्टेशन नांदुरा येथे मिटिंग घेण्यात आली.* - Maratha Darbar

Breaking

Saturday, October 5, 2024

*पोलीस स्टेशन नांदुरा हद्दीतील शाळा व कॉलेज चे मुख्याध्यापक व प्राचार्य यांची पोलीस स्टेशन नांदुरा येथे मिटिंग घेण्यात आली.*

 पोलीस स्टेशन नांदुरा 

दिनांक 05/10/2024 रोजी 11.00 वा ते 12.00 वा पोलीस स्टेशन नांदुरा हद्दीतील शाळा व कॉलेज चे मुख्याध्यापक व प्राचार्य यांची पोलीस स्टेशन नांदुरा येथे मिटिंग घेण्यात आली. मिटिंग मध्ये

1. शाळेमध्ये महिला कौन्सिलर ठेवणे 

2. शाळेमधील असुरक्षित जागा कॉर्नर इत्यादी ठिकाणी सुद्धा सीसीटीव्ही लावणे.

3. शाळेच्या महिला विद्यार्थी यांच्या संस्थेच्या दृष्टीने ऑडिट करणे 

4. मुला मुलींचे वॉशरूम टॉयलेट वेगवेगळे ठेवणे 

5. प्रत्येक शाळेमध्ये तक्रारपेटी लावण्यात यावी व ती तक्रारपेटी विशिष्ट दिवशी मुख्याध्यापक आणि बीट अंमलदार किंवा पोलीस अधिकारी यांचे समक्ष उघडून तक्रारीवर कार्यवाही करण्यात यावी.

6. स्कूल बस मध्ये महिला केअरटेकर असावी 

7. स्कूल बस वाहक चालक यांचे चरित्र प्रमाणपत्र काढून घ्यावे.

8. आपत्कालीन परिस्थितीत डायल 112 वर कॉल करावा या व इत्यादी महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. 

९. काही तक्रार असल्यास पो. नि. विलास पाटील 8888437888

१०. मपोउप नि क्रांती ढाकणे 8605113966 यांना तक्रार सांगावे.

 सदर मिटींगला  पोलीस स्टेशन हद्दीतील  एकूण 20 मुख्याध्यापक/ प्राचार्य  उपस्थित होते. शांतता राहिली.

पोलीस निरीक्षक विलास पाटील 

पोलीस स्टेशन नांदुरा