अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ शेगांव तालुका व शहर नुतन कार्यकारणी जाहीर - Maratha Darbar

Breaking

Monday, July 29, 2024

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ शेगांव तालुका व शहर नुतन कार्यकारणी जाहीर

 *अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ शेगांव तालुका व शहर नूतून कार्यकारणी जाहीर* 


मराठा दरबार न्यूज शेगांव 


 


पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असणारी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना रजिस्टर नंबर एफ 5595 या संघटनेची शेगाव तालुका व शहर कार्यकारिणी दिनांक 25 /7/ 2024 रोजी विश्रामगृह शेगाव येथे एका बैठकीत गठीत करण्यात आली  सदर बैठक अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे माजी तालुका अध्यक्ष देवचंद्र समदुर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी बैठकीला उमेश भाऊ शिरसाट श्रीकांत भाऊ कलोरे सागर सिरसाट उमेश राजगुरे अर्जुन कराळे संजय ठाकूर गौतम इंगळे ऋषिकेश देठे आदी पत्रकारांची उपस्थिती होती 

  यावेळी शेगाव तालुका अध्यक्षपदी सागर बाळकृष्ण सिरसाट तर शेगाव शहर अध्यक्षपदी श्रीकांत गोविंद कलोरे यांची निवड करण्यात आली तसेच शेगाव तालुका सचिव पदी गौतम इंगळे तर शेगाव शहर सचिव पदी उमेश राजगुरे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच शेगाव तालुका उपाध्यक्षपदी अर्जुन कराळे तर शहर उपाध्यक्षपदी संजय ठाकूर तालुका कोषाध्यक्षपदी ऋषिकेश देठे तर शहर कोषाध्यक्षपदी दिनेश घाटोळ यांची नियुक्ती करण्यात आली तसेच सदस्य पदी कमलेश शर्मा, अक्षय सावदेकर, मिलिंद चराटे, दादा बाराहाते आदिंची  निवड करण्यात आली